थोडक्यात परिचय
डॉ. विनय सहस्रबुद्धे हे मनाने एक राष्ट्रवादी समाज कार्यकर्ते आहेत, व्यवसायाने ते राज्यशास्त्राचे संशोधक – विद्यार्थी आहेत आणि लोकशाहीचे प्रशिक्षक आहेत, आणि ह्या कार्यात त्यांची पदोन्नती होऊन ते आता संसदेचे सदस्य झाले आहेत. डॉ. सहस्रबुद्धे ह्यांनी मुंबई विद्यापीठामधून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून राज्यशास्त्रामध्ये पीएचडीसुद्धा प्राप्त केलेली आहे.
जुलै २०१६ पासून संसदेत राज्यसभेचे (भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह) महाराष्ट्रातील सदस्य असणारे डॉ. सहस्रबुद्धे हे इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रीलेशन्स (आयसीसीआर) (www.iccr.gov.in) चे अध्यक्ष आहेत, जी भारताची सांस्कृतिक शक्ती प्रचार संघटना आहे. जुलै २०२० मध्ये, डॉ. सहस्रबुद्धे ह्यांची मनुष्यबळ विकासावरील संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली होती.
डॉ. सहस्रबुद्धे नवी दिल्लीतील पब्लिक पॉलिसी रीसर्च सेंटरचे (www.pprc.in) मानसेवी संचालक आहेत. डॉ. सहस्रबुद्धे सध्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे (आरएमपी) उपाध्यक्षसुद्धा आहेत, ही एक अशी अनोखी संस्था आहे जिथे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ महाव्यवस्थापकाचे पद भूषविले आहे. आरएमपी ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसाठीची आणि समाज कार्यकर्त्यांसाठीची एक एकमेवाद्वितीय अशी संशोधन आणि प्रशिक्षण अकादमी आहे. डॉ. सहस्रबुद्धे भूषवत असलेल्या अनेक भूमिकांमध्ये, इंडियन सोशल रीस्पॉन्सिबिलिटी नेटवर्क (आयएसआरएन) ह्या दिल्ली स्थित संस्थेच्या उपाध्यक्षपदाचाही समावेश होतो. डॉ. सहस्रबुद्धे ह्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे (www.bjp.org) राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे.

१० नोव्हेंबर १९५७ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये विनय ह्यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण सहस्रबुद्ध्यांच्या गावी धुळे येथे झाले, पुढे नाशिकजवळच्या त्र्यंबक विद्यामंदिरात आणि शेवटी नाशिकमध्ये पूर्ण झाले. इयत्ता ४थी मध्ये असताना, एका स्पर्धा परीक्षेमधून विनय ह्यांची शासकीय विद्या निकेतन ह्या नाशिक येथील शासकीय सार्वजनिक शाळेमध्ये निवड झाली, जी ग्रामीण भागांतील गुणवान विद्यार्थ्यांना घडवण्यासाठीची एका अभिनव शालेय शृंखलेपैकी एक होती.
इयत्ता ५वी पासून इयत्ता ११वी पर्यंत, ते ह्याच निवासी शाळेमध्ये शिकले. इथेच त्यांना नेतृत्वाचे आणि कल्पकतेचे पहिले धडे मिळाले. त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे आणि वक्तृत्व, अभिनय, लेखन आणि पत्रकारिता ह्यांसारख्या उपक्रमांतील कौशल्यांमुळे ते शाळेतील अनेक उपक्रमांमध्ये चमकत राहिले. त्यांच्या शाळेत अनेक वर्षांपासून मुख्याध्यापकपदी काम करणारे डॉ. बी बी सिंगम, तसेच वसंत डोंगरगावकर, एम एम नलनीकर, व इतर शिक्षकांना ते आपल्याला घडवण्याचे श्रेय देतात.