About Vinay

Journey so far

A staunch social activist of nationalist ideology, Dr. Vinay P. Sahasrabuddhe is a well- known scholar-thinker of political science and democracy. A renowned trainer of elected representatives by profession, Dr. Sahasrabuddhe represented the state of Maharashtra as a Member of Parliament (Rajya Sabha), 2016 – 2022. He holds a Doctorate in Political Science (Ph.D.) from the prestigious University of Mumbai and did his post- graduation in English literature. He is currently serving as the President of the Indian Council for Cultural Relations, a prestigious Govt. of India body, that promotes Indian culture across the globe. Dr. Sahasrabuddhe has also been the Chairman of the Parliamentary Standing Committee on Education, Women, Children, Youth and Sports EWCY&S).

थोडक्यात परिचय

डॉ. विनय सहस्रबुद्धे हे मनाने एक राष्ट्रवादी समाज कार्यकर्ते आहेत, व्यवसायाने ते राज्यशास्त्राचे संशोधक – विद्यार्थी आहेत आणि लोकशाहीचे प्रशिक्षक आहेत, आणि ह्या कार्यात त्यांची पदोन्नती होऊन ते आता संसदेचे सदस्य झाले आहेत. डॉ. सहस्रबुद्धे ह्यांनी मुंबई विद्यापीठामधून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून राज्यशास्त्रामध्ये पीएचडीसुद्धा प्राप्त केलेली आहे. 

 

जुलै २०१६ पासून संसदेत राज्यसभेचे (भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह) महाराष्ट्रातील सदस्य असणारे डॉ. सहस्रबुद्धे हे इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रीलेशन्स (आयसीसीआर) (www.iccr.gov.in) चे अध्यक्ष आहेत, जी भारताची सांस्कृतिक शक्ती प्रचार संघटना आहे. जुलै २०२० मध्ये, डॉ. सहस्रबुद्धे ह्यांची मनुष्यबळ विकासावरील संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली होती.

डॉ. सहस्रबुद्धे नवी दिल्लीतील पब्लिक पॉलिसी रीसर्च सेंटरचे (www.pprc.in) मानसेवी संचालक आहेत. डॉ. सहस्रबुद्धे सध्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे (आरएमपी) उपाध्यक्षसुद्धा आहेत, ही एक अशी अनोखी संस्था आहे जिथे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ महाव्यवस्थापकाचे पद भूषविले आहे. आरएमपी ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसाठीची आणि समाज कार्यकर्त्यांसाठीची एक एकमेवाद्वितीय अशी संशोधन आणि प्रशिक्षण अकादमी आहे. डॉ. सहस्रबुद्धे भूषवत असलेल्या अनेक भूमिकांमध्ये, इंडियन सोशल रीस्पॉन्सिबिलिटी नेटवर्क (आयएसआरएन) ह्या दिल्ली स्थित संस्थेच्या उपाध्यक्षपदाचाही समावेश होतो. डॉ. सहस्रबुद्धे ह्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे (www.bjp.org) राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे.